सर्व भारतीयांनी आवर्जून पहावा हा सिनेमा. आजतागायत स्वा. सावरकरांविषयी हेटाळणी, द्वेष युक्त टीकाटिप्पणी काही लोकांकडून सतत ऐकायला येत होती, अनेक खोटे आरोप ह्या सच्चा देश भक्तावर करण्यात आले, त्यांना खलनायक ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न काही लोकांनी केला, त्या सर्वांना मा. श्री रणदिप हुड्डा ने सणसणीत चपराक लगावली आहे. तरुणांनी अवश्य हा सिनेमा बघावा. बघितल्यावर घरी येवून मनन, चिंतन, सावरकरांविषयी पुस्तकांचे वाचन जरुर करावे व नंतरच हा महान देशभक्त वीर होता की नाही ते ठरवावे.