आत्ताच बाईपण भारी देवा बघून आले. काय बोलू? केवळ निःशब्द...स्त्रीत्व काय असतं , कसं असतं ,कसं निभवावं लागतं याचं अतिशय समर्पक चित्रण...भावनांचा कल्लोळ , हास्याच्या लकेरी , अगतिकतेची बंधनं झुगारून मोकळा श्वास घ्यायला शिकवणारी ही कलाकृती....."अर्धं आयुष्य उलटलं तरी कुणीही म्हणत नाही की थांब ! मोकळा श्वास घे...."अंगावर काटे आणि डोळ्यांत पाणी येणारच.......नाही आलं तर....तर स्त्रीलाच स्त्री समजली नाही....खरं स्त्रीत्व आम्हां बायकांसोबतच दिग्दर्शक देखील जगले आहेत......ह्या चित्रपटाच्या माध्यमातून...... सलाम तुम्हाला....🤝