गुलाबजाम एक गोड धक्का
उद्याच्या काही कार्यक्रमाचे काम व
उद्याचा लेख पाठवायला आज खूप उशीर झाला होता, तो लिहून झालेवर अचानक कुटुंबासमवेत गुलाबजाम पहायला जायचे ठरले, थियतरवर गेलो तर बॉक्सऑफिस वर बुकिंग करणारा म्हणाला फक्त आठ तिकिटे शिल्लक आहेत मी चार घेतली केवळ १०% हुन कमी मराठी संख्या असणाऱ्या परिसरातील थिएटरला मराठी
हाऊसफुल हा एक सुखद अनुभवच , चांगले सिनेमे निघालेकी प्रेक्षक मिळतोच ,
Marketing management says "customers are always waiting for good Products " . चित्रपटात
Dial n chef ही व्यवसाय सकल्पना खूप
चांगली रेखाटली आहे , सुगरण महिलांना चांगली बिजनेस आयडिया मिळेल, मराठी पदार्थाना ग्लॅमर येईल , पटेलांनी असेच अमेरिकेत
हॉटेल सुरू केली आज USA त ६०% हॉटेल पटेलांची आहेत, या सीनेमाच्या हिरोने ही UK ला मराठी हॉटेल सुरू केले , खूप खोल व अर्थपूर्ण परिणाम करणारा चित्रपट पाहताना आनंद वाटला, अन्न
पदार्थ सिनेमात पात्र असावं असं चित्रीकरण खूप सुंदर . गाणी विनोद ग्लॅमर
नसताना शेवट पर्यंत नजर खेळवून ठेवतो हे
सिनेमाच खूप मोठं यश आहे...
एक प्रेक्षक म्हणून १० पैकी १० गुण , पैसे वसूल....