वेगळ्या वाटेने जाणारा मराठी चित्रपट. रवी जाधव आणि संपूर्ण "Nude " टीम च अभिनंदन . कल्याणी मुळे, उषा जाधव यांचा सहजसुंदर अभिनय. सुंदर फ्रेम्स, छायाप्रकाश, गरिबीतलं जीवन आणि यमुनेच्या मनात फुलात जाणारी कलात्मकता . "Nude" पोसिंग आणि पेन्टीन्ग सारखा विषय असूनही कुठे बीभत्स न वाटणारा हा चित्रपट आवर्जून पहाच . यमुना जेव्हा पहिल्यांदा पोसिंग साठी कपडे उतरवते त्या वेळी बॅकग्राऊंड मधे "ये तन थाट तम्बुरे का" हे क्लासिकल गाणं वाजतं जे अगदी समर्पक आहे. चित्रपटाचा शेवट काहीसा अनपेक्षित आहे. चित्रपट संपल्यावरही आपण खुर्चीवरून पाच मिनिटे उठत नाही..