कोकणातील एका सर्वसामान्य कुटुंबाची कथा, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेली आहे. त्या कुटुंबातील
व्यक्तीरेखा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याही घरात असल्यासारखे वाटतं.घरातील कलह अगदी हळुवारपणे सोडवताना मनाची काय अवस्था होते त्याचे चित्रीकरण दिगदर्शकाने खूप सुंदर केले आहे. कुटुंबातील सर्वांसह पाहावा असा दर्जेदार चित्रपट.