फर्स्ट डे फर्स्ट शो असा हा सिनेमा मी पाहिला आणि खूप दिवसांनी एक सर्वांगसुंदर सिनेमा पाहिल्याचे समाधान लाभले. हा सिनेमा आजचे कॉलेज जीवन ,समाजकारण आणि राजकारण यावर आधारित आहे. सिनेमात गीतेच्या तत्वज्ञाना चा खूपच चांगल्या प्रकारे वापर केला आहे.सुधानशू बुडूख च्या रूपाने मराठी सिनेमाला एक उमदा असा नायक मिळाला आहे. तो या सिनेमाचा नायक असून आपली भूमिका तो अक्षरशः जगला आहे. कु. शिवानी जावकर उर्फ शीतल जी ''लागिर झालं " या टीव्ही मालिकेत होती तिने या सिनेमात प्राध्यापिका ची भूमिका छान पने वठवली आहे. यात तीन की चार गाणी असून ती ठेका धरायला लावणारी आहेत. सिनेमाचे बरेचसे शूटिंग हे खऱ्या खुऱ्या प्रशस्त अशा कॉलेज इमारतीतआणि तेथील विद्यार्थी समवेत केल्याने ते खरे आणि जिवंत असे वाटते. सर्वच गाणी , बॅकग्राऊंड आणि मुख्य संगीत हे उत्तम रित्या केलेले आहे. इतर सर्वच छोट्या मोठ्या कलाकारांनी आपली कामे उत्तम रित्या केली आहेत. चित्रपट जराही कंटाळवाणा वाटत नाही. तरुण कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना हा सिनेमा खूपच भावेल.