*फर्जंद ... शिवकालीन युद्धपट*
३०० हा हॉलीवूड चित्रपट कोणी कोणी पहिला आहे? ३०० हा हॉलीवूड चित्रपट जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या मनात येत कि असे पराक्रम गाजवणारे असंख्य मावळ्यांच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत त्याची अशी एखादी मराठी फिल्म का बनत नाही......
आणि काल facebook वर एका मित्राची पोस्ट वाचली कि ३०० ह्या हॉलीवूड चित्रपटासारखा एखादा चित्रपट मराठीत व्हावा हि इच्छा "फर्जंद" या चित्रपटाने पूर्ण केली....बस मग काय ट्रेलर पाहून घेतला.. जम आवडला आपल्याला...
आणि आज आम्ही पण जाऊन पाहून आलो...
स्टोरी तर अजिबात सांगणार नाही ... पण ज्याला ज्याला आपण शिवरायांचा मावळा व्हावस वाटत अश्या सगळ्यांनी पाहावा असा आहे....
खूप चं छान चित्रपट झाला आहे...अप्रतिम ..
#फर्जंद