काल वीर सावरकर चित्रपट पहिला. चित्रपटातील काही तीव्र आतडे विरघळणारी दृश्ये पाहताना अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले. आपल्या मातृ राष्ट्रासाठी निस्वार्थीपणे प्राण अर्पण करणारे आपले स्वातंत्र्यसैनिक !! नि:शब्द... सावरकर हे एक शक्तिशाली आणि निर्भय पुरुष होते आणि त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायीच नाही तर निर्दयपणे आव्हानात्मक आहे. त्या माणसाला जे त्रास सहन करावे लागले ते कोणाच्याही क्षमतेच्या पलीकडे आहे... काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा त्याच्या आत्म्याला, त्यांच्या मानसिक क्षमतेला तोडू शकले नाही...🙌 विशेष करून त्यांच्या कुटुंबियांचा त्याग आणि समर्पण एक भारतीय म्हणुन आपण कधीही विसरू शकत नाही. या मरणयातना भोगण्याची ताकत कोठुन आली हे त्या परमेश्वरलाच ठाऊक... आणि मला नाही वाटत एवढी कठोर शिक्षा त्या काळच्या कोणत्या राजकारण्यांनी भोगली असेल. अशा या भारतमातेच्या सुपुत्रास शतशः नमन.👏 🙏🙏
स्वातंत्र्यविरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा यांनी आश्चर्यकारकपणे कठीण आणि प्रिय पात्राला न्याय दिला आहे. इतका संवेदनशील आणि गुंतागुंतीचा चित्रपट बनवणे हे कोणा ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही. त्यामुळे संपूर्ण टीमला सलाम.🙏 #Mustwatch📽️