अत्यंत उच्च कोटीची मांडणी. तसही तात्याराव मात्र दोन तिन तासात मांडणं अवाक्याबाहेरच आहे असं वाटत होतं. पण रणदिप हुडाने ते शक्य करून दाखवलं. त्यांनी मांडलेले प्रश्न खरच अंतर्मुख करतात खरच कोणत्याही कॉंग्रेस नेत्याला कधी काळ्या पाण्याची शिक्षा का नाही झाली? त्यांच्या नेत्यांना म्हणजे गांधींना आगाखान पॅलेससारख्या ठिकाणीच कैदेत संपुर्ण सुविधांसह का ठेवलं गेलं असेल? हे प्रश्न अनुत्तरीत राहतातच. असो, तो राजकारणाचा विषय आहे का अजुन काही हे गौडबंगालच वाटतय. कॉंग्रेसच्या काही नेत्यांमुळे बाकी अनेक लोकांना का कस्पटासमान वागवलं गेलं हे ही अनुत्तरीत आहे.
पण अनेक वर्षांनंतर काहीतरी चांगलं पाहिल्याच समाधान लाभलं पैसे वसुल सिनेमा झालाय. अशा माणसाच्या कतृत्वाला राजकीय लाभासाठी हिन लेखतात त्यांचा अपमान करतात हि गोष्ट बदलायला सुरूवात झाली तर बरं वाटेल.