अडीच तासाच्या चित्रपटात सावरकरांना न्याय दिला जाऊ शकत नाही. हा चित्रपट उत्तम आहे. सावरकर जसे दिसत होते तसेच दिसायला हवे म्हणून रणदीप हुडा याने शरीरयष्टी, देहबोली, चेहरेपट्टी, तुरुंगात असताना पडलेले टक्कल... यावर जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. रणदीप हुडा याने सावरकरांसाठी जे धाडस केले आहे, जो त्याग केला आहे त्यासाठी एक हिंदू म्हणून मी ऋणी राहीन.